एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकShilpa Shirodkar Tested Covid-19 Positive: पुन्हा धाकधूक वाढली, दिग्गज अभिनेत्रीला कोरोनाची लागण, स्वतः इन्स्टा पोस्टद्वारे दिली माहिती
Shilpa Shirodkar Tested Covid-19 Positive: अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. स्वतः शिल्पानं यासंदर्भात माहिती दिली आहे.
By : नामदेव जगताप|Updated at : 20 May 2025 06:37 AM (IST)
Shilpa Shirodkar Tested Covid-19 Positive
Source :
ABP MajhaShilpa Shirodkar Tested Covid-19 Positive: 'बिग बॉस 18'ची (Bigg Boss 18) स्पर्धक आणि 90 चं दशक गाजवणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Actress Shilpa Shirodkar) कोविड-19 पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आढळली आहे. अभिनेत्रीनं स्वतः पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. 2020 आणि 2021 मध्ये कोरोना व्हायरसनं हैदोस घातला होता. त्यानंतर कोरोनाची साथ क्षमल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, कोरोनाच्या रुग्णांमध्येही काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिल्पा शिरोडकरनं सर्वांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 18'मध्ये सहभागी झाली होती. बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्रीनं अचानक रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री घेतल्यामुळे चाहतेही खूश झाले होते. पण, शिल्पा ट्रॉफीवर आपलं नाव कोरू शकली नव्हती. अशातच आता शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झाल्यामुळे चाहत्यांची चिंता काहीशी वाढली आहे. सोशल मीडियावरुन स्वतः शिल्पा शिरोडकरनं यासंदर्भात माहिती दिली. तसेच, सर्वांना सुरक्षित राहण्याचं आणि मास्क घालण्याचं आवाहनही केलं. सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शिल्पाला लवकर बरं वाटावं म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
A post shared by Shilpa Shirodkar Ranjit (@shilpashirodkar73)
शिल्पा शिरोडकरनं सोमवार, 19 मे रोजी इंस्टाग्रामवर कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तिनं इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय की, "नमस्कार मित्रांनो, मी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहे. सुरक्षित रहा आणि मास्क घाला. शिल्पा शिरोडकर." दरम्यान, आता अभिनेत्रीला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे सर्वांनाच काळजी वाटत आहे. तिचे प्रियजन आणि चाहते लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहेत.
शिल्पा शिरोडकरसाठी सोनाक्षी सिन्हाची खास पोस्ट
सोनाक्षी सिन्हानं शिल्पा शिरोडकरच्या पोस्टवर कमेंट केली आहे. सोनाक्षीनं लिहिलंय की, "अरे देवा. शिल्पा स्वतःची काळजी घे. लवकर बरी हो." जुही बब्बरनं लिहिलंय की, "अरे देवा, स्वतःची काळजी घे." इंदिरा कृष्णा यांनीही अभिनेत्रीला काळजी घेण्यास आणि लवकर बरं होण्यास सांगितलं आहे. शिल्पाची बिग बॉसच्या घरातली मैत्रीण चुम दरंग आणि बहीण नम्रता शिरोडकर यांनीही तिला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
शिल्पा शिरोडकर ही 90च्या दशकातली एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. शिल्पानं 1989 ते 2000 पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 13 वर्षांनंतर, तिनं 'एक मुठ्ठी आसमान' द्वारे पुनरागमन केलं आणि त्यानंतर 2024 मध्ये सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस 18 मध्ये दिसली. तिच्या पतीचं नाव अपरेश रणजीत आहे आणि तिला एक मुलगी देखील आहे. शिल्पाचा मेहुणा साऊथ सुपरस्टार महेश बाबू आहे.
Published at : 20 May 2025 06:37 AM (IST)
Tags :
Actress Corona Virus Shilpa Shirodkar BOLLYWOOD COVID 19
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
GT vs DC IPL 2025: खंबीर सुदर्शन, बुद्धिमान शुभमन
Opinion